आयटीआय अमरावती ( मुलींची) येथील माधुरी डोंगरे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल हिला विदेशात लंडन येथे रोजगार -यशोगाथा
आजची यशोगाथा लिहिताना अतिशय मनाला आनंद होत आहे ही अतिशय दिव्य आणि आयटीआय करणाऱ्या मुलींसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.
मंजिले बडे जिद्दी होती है !
हासिल कहा नसीब से होती है!
मगर वहा तुफान भी हार जाते है !
जहा कस्तिया जिद जीत पर होती है!
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अमरावती येथील माधुरी अरुण डोंगरे ही बडनेरा येथील रहिवासी असून तिला एक बहिणी आहेत वडीलांच्या जेमतेम परीस्थिती बारावी पर्यंत शिक्षण झाले. पुढे उच्च शिक्षण घेण्याची तिची फार इच्छा होती. परंतु परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शेवटी आयटीआय करण्याचे ठरले. तर तिने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती मुलींची येथे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल या व्यवसायाला सन 2004 मध्ये प्रवेश मिळाले आणि जुलै 2006 मध्ये दोन वर्षीय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल हा अभ्यासक्रम पूर्ण केले.
परंतु माधुरीचे स्वप्न होते की उच्च शिक्षण घ्यायचे "हौसले बुलंद होनी चाहिये ! यश आपल्या मागे धावतो म्हणतात ना तिची उंच भरारी घेण्याची फार इच्छा होती . आयटीआय पास झाल्यानंतर ती मागे वळून बघितली नाही पुढे काय तर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन दिव्तीय वर्षाचा प्रवेश घेतला आणि 2006-2008 मध्ये फस्ट क्लास मध्ये पास झाली.
आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याही पुढे ती थांबली नाही तर पुढे 2008 मध्ये थेट बी.ई च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळला आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन सन 2008- 2011 मध्ये फर्स्ट क्लास मध्ये पास झाली.
महाराष्ट्र मध्ये एकूण 417 शासकीय आयटीआय आहेत. राज्यातील कोणत्याही आयटीआय मध्ये मुली शिकत असेल अशा मुलींनी माधुरी डोंगरे पासून प्रेरणा घ्यायला काहीच हरकत नाही असे मला वाटते. कारण आयटीआय मध्ये शिकणाऱ्या मुले व मुली अतिशय गरीब आणि सामान्य कुटुंबातील असतात. परंतु तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर नक्कीच तुम्ही सामान्य नाहीत.
यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा त्यात तुमच्या यशाची किल्ली आहे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही शिखर सर करू शकता. माधुरीच्या बाबतीत हेच झाले आजच्या युगात गरिबांसाठी उच्च शिक्षण हे फक्त स्वप्न राहिले परंतु तुमचे ध्येय आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर परिस्थिती तुमच्या पुढे नमते होते.
वक्त से लडकर जो नसीब बदल दे
इन्सान वही जो अपनी तकदीर बदल दे
कल क्या होगा कभी मत सोचो
क्या पता कल वक्त खुद आपली तस्वीर बदल दे
माधुरीला खरं तर आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल करून तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती इथेच थांबली नाही .मुझे और आगे बढना है ! तिच्या आई-वडिलांनी आपल्या जीवाचे रान करून तिचे मनोबल वाढवले मग तिने आयटीआय तासिका तत्त्वावर काही दिवस नोकरी पण केली.आणि पुढे तिला विदेशात नोकरी मिळाली. परंतु तिचे मन तिथे स्वस्त बसू देत नव्हते त्याचवेळी तिने नोकरी सोडून दिली .
आणि सन 2023- 24 या वर्षांमध्ये तिने MSc in Embedded system and internet University UK (United Kingdom) येथे उच्च शिक्षणाची डिग्री घेऊन आयटीआय मुलींची अमरावती येथून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी विदेशात लंडन येथे मोठ्या पगाराची नोकरी म्हणजेच रोजगार करीत . ही बाब आयटीआय साठी फार मोठी उपलब्धी आहेत्.यामुळे महाराष्ट्र राज्यांतील आयटीआय आणि आयटीआय करणाऱ्या मुलींसाठी ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील माधुरी डोंगरे यांनी खरंच उंच भरारी घेऊन हम किसीसे कम नही. आयटीआयची महिमा सिद्ध करून दाखवली. तिच्या यशामागे तिची स्वतःचे प्रेरणा तिचे गुरुजन आणि श्रीमती आशा अरुण डोंगरे आई-वडील ती यांना देत आहे.
काम करो ऐसा की एक पहचान बन जाए
हर कदम ऐसा चलो की निशान बन जाए
यहा जिंदगी तो हर कोई काट लेता है
जिंदगी जिओ इस कदर की मिसाल बन जाए!
माधुरी डोंगरे हिने आयटीआय मुलींची अमरावती येथुन पुर्ण इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल केले.आयटीआय नांव रोशन केल्या बाबत संस्थेचे श्री.एस.एन.राठी प्राचार्य,श्री. व्ही. एम. पुंड (शिल्पनिदेशक) इलेक्ट्रॉनिक्स श्री एम .एस. पुनसे गटनिदेशक सध्याचे प्राचार्य श्री राजेश एकनाथराव शेळके तिचे शिल्पनिदेशक श्री.विजय पुंड यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छुक दिलेल्या आहेत.
तसेच श्री प्रदीप घुले उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांनी माधुरी डोंगरे हिला पुढील वाटचालीसाठी अभिनंदना सह शुभेच्छा दिल्या आहेत.
संकलन:-श्री.एन.के.राठोड (शि.नि.)आयटीआय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर -8530404403
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments