आयटीआय यवतमाळ येथे पारंपरिक क्रीडा महाकुंभ जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन व बक्षीस समारोप
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक व अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त चे अवचित साधून माननीय श्री मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यामध्ये पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे आयोजन प्रथम संस्था स्तरावर आयोजित करण्यात आले होते तर दिनांक ३/३/२०२५ रोजी जिल्हा स्तरावर आयटीआय यवतमाळ आयोजन करण्यात आले होते.
लंगडी, फुगडी ,लेझीम ,लगोरी ,पावनखिंड दौड,विटी दांडू ,पंजा लढविणे ,दंड बैठक ,कबड्डी ,खो-खो ,दोरीच्या उड्या अशा बारा प्रकारच्या खेळांचे या क्रीडा महाकुंभामध्ये समाविष्ट होते प्रकारचे पारंपारिक खेळ समावेश होतो.यवतमाळ जिल्ह्यातील 16 शासकीय आयटीआय यामधील मुली आणि मुले या स्पर्धेकरिता वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री गजानन राजूरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ, प्रमुख अतिथी म्हणून श्री विनोद नागोरे प्राचार्य आयटीआय यवतमाळ श्री रमेश राठोड प्राचार्य आयटीआय दारव्हा श्री मुलमुले प्राचार्य आयटीआय राळेगाव प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते ठिकाणी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आणि विजयी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.सूत्रसंचालन श्री अमर विहरे यांनी केले. विजय झालेल्या चमूना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवण्यात आले आणि विभागीय स्तरावर अमरावती येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता त्यांना शुभेच्छा देण्यात आले त्यामध्ये विजयी टीम व संस्था खालील प्रमाणे.
👉दोरीच्या उड्या मुले
1) कृष्णा नरेशराव रोकडे, आयटीआय यवतमाळ
![]() |
कृष्णा नरेशराव रोकडे, आयटीआय यवतमाळ |
दोरीच्या उड्या मुली
1) कु. प्रेरणा बाबाराव कोवे आयटीआय आंतरगाव
![]() |
कु. प्रेरणा बाबाराव कोवे आयटीआय आंतरगाव |
पंजा लढविणे मुले
1) सुजल सिद्धार्थ शेळके आयटीआय दिग्रस
पंजा लढविणे मुली
1) कु. स्वीटी गणेश राठोड आयटीआय दारव्हा
दंड बैठक मुली
कु.दिव्या प्रकाश वैद्य-आयटीआय राळेगाव
दंड बैठक मुले
द्रविड वाठोरे-आयटीआय उमरखेड
सांघिक स्पर्धेमध्ये
फुगडी मुली--आयटीआय यवतमाळ
![]() |
फुगडी मुली--आयटीआय यवतमाळ |
लेझीम - आयटीआय पांढरकवडा
![]() |
लेझीम - आयटीआय पांढरकवडा |
लंगडी मुले:- आयटीआय दारव्हा
![]() |
लंगडी मुले:- आयटीआय दारव्हा |
विटी दांडू -आयटीआय दिग्रस
रस्सीखेच मुली -आयटीआय दारव्हा
![]() |
रस्सीखेच मुली -आयटीआय दारव्हा |
रस्सीखेच मुले आयटीआय पांढरकवडा
![]() |
रस्सीखेच मुले आयटीआय पांढरकवडा |
लगोरी मुली-आयटीआय मारेगांव
लगोरी मुले-आयटीआय-राळेगांव
विजेत्या स्पर्धकांना आयटीआय यवतमाळ च्या वतीने पारंपारिक क्रीडा महाकुंभ क्रीडा स्पर्धाचे प्रमाणपत्र आणि मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.
स्पर्धेकरिता विशेष परिश्रम आयटीआय यवतमाळ येथील सर्व कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी कठोर परिश्रम घेऊन पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे यशस्वीरित्या पार पाडल्याबाबत संस्थेचे प्राचार्य श्री विनोद नागोरे यांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांचे शब्द सुनाने स्वागत केले शेवटी राष्ट्रगीताने या पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे समारोप करण्यात आले.शेवटी अमर विहरे यांनी आभार मानले.
Notiffication- येथे क्लिक करा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments