आयटीआय पांढरकवडा येथे 26 जुलै रोजी विजय दिवस साजरा
वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा येथे दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आले . मा.मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल विकास उद्योजकांना नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राज्यातील 417 आयटीआय मध्ये एकाच वेळी संपन्न झाले. तर आयटीआय लोणावळा येथे मा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विजय दिवस साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेतील ज्येष्ठ शिल्पनिदेशक एन.के.राठोड होते.तर संस्थेचे प्राचार्य राहुल पळवेकर यांच्या मार्गदर्शनात प्रमुख अतिथी म्हणून सुधीर बनसोड ,प्रदीप सोमनकर तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय दिवस साजरा करण्यात आले .तसेच प्रमुख वक्ता म्हणून माजी सैनिक प्यारा कमांडो एसीपी सुभेदार श्री योगेश वामन राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांची हस्ते दिप प्रज्वलन व भारत माता यांच्या प्रतिमा व कारगिल युद्धातील वीर सैनिकाचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने प्यारा कमांडो योगेश राठोड यांचे शाल व श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले . ह्या विजय दिवसाची प्रास्ताविक प्रदीप सोमनकर यांनी केले.
एसीपी सुभेदार प्यारा कमांडो योगेश राठोड यांनी 26 जुलै 1999 विजय दिवस का साजरा करण्यात येतो ,तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती योगदान असे मोलाचे मार्गदर्शन करून त्यांच्या भाषणातून कारगिल युद्धाला उजाळा देऊन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे रोप लावले. अंगावर शहारे येईल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम श्री किरण राठोड, किशोर नारींगे ,गणेश फुटाणे, बबन कोवे, लखन जेधे, विशाल अर्गुलवार, सचिन बोरवार, कुमारी वैष्णवी कुबडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दुर्योधन नारनवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश गेडाम यांनी केले. भर पावसात संस्थेतील कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने प्रामुख्याने उपस्थिती होते शेवटी विजय दिवसाची सांगता राष्ट्रगीताने झाली
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments