आयटीआय राहाटगांव जिल्हा अमरावती येथील मुकुंदराजे घुईखेडकर फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी बनला यशस्वी उद्योजक यशोगाथा
जीवनाच्या विविध पैलू मध्ये अवॉर्ड आणू शकते ज्यामध्ये छंद, काम, नातेसंबंध, इतिवृत्तभावना किंवा उत्साह आहे जी तुम्हाला ज्या गोष्टीची मनापासून काळजी आहे ती मिळविण्यास प्रवृत्त करते. बी.ए. शिक्षण पूर्ण करीत असताना मनात एकच ध्यास वेगळे काही तरी करायचे फॅशन डिझाईन मध्ये करिअर करणाऱ्या एका विद्यार्थ्याचे यशोगाथा लिहिताना अतिशय आनंद होत आहे.
एका सामान्य कुटुंबात दोन भाऊ एक बहीण असणाऱ्या शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुकुंदाचे बी.ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. परंतु कोरोना काळात देशातील बऱ्याच मुलांचे रोजगार हिराविले तर काहींवर दुःखांचे डोंगर कोसळले .अशातच त्याचे नोकरी गेली. नंतर काय तर मुकुंदराजे त्याच्या आवड असलेल्या आयटीआय मधील फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ट्रेड मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
सन 2023 -24 एका वर्षाच्या नॉन इंजिनिअरिंग असलेल्या ट्रेड मध्ये प्रवेश घेतला आणि यशस्वीरित्या चांगल्या गुणांनी पास होऊन बाहेर पडला. त्यानंतर अमरावती येथे गारमेंट कंपनीमध्ये आणि बुटीक यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क करण्यांचे काम केले.येन तारुण्यात आईचे छत्रछाया हरपले .एक भाऊ, एक बहीण,तर त्यांचे एकाचे दोन करून शेवटी मुकुंदराजेची विवाह झाले.
खरंतर लहान भाऊ ॲग्रीकल्चर शिक्षण घेऊन वडिलांच्या शेती व्यवसायाला मदत करतो. घुईखेड तालुका चांदुर गावापासून जवळपास असल्याने फॅशन डिझाईन बुटी मॅनेजमेंट शॉप व कारखान्याचे सुरुवात 2025 मध्ये करण्यात आले.
शेवटी स्वतःची आवड असलेल्या व्यवसाय करण्याचा मानस आयटीआय प्रशिक्षणामुळे पूर्ण झाले. पत्नी शीतल घुईखेडकर सह महिला सक्षमीकरण ,सबलीकरण ,त्यांचे आत्मविश्वास वाढीसाठी, फॅशन डिझाईन बुटीक मॅनेजमेंट मध्ये ६ महिलांना रोजगार देण्याचा कार्य आयटीआय मुळे सार्थ झाले असे मुकुंदराजे यांनी व्यक्त केले.
मुकुंदराजे यांच्या आवडीमध्ये सौ. आरती यादव मॅडम आयटीआय राहाटगांव जिल्हा अमरावती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि आई-वडिलांचे आशीर्वाद सोबत पत्नीने वाढविलेले मनोबल आज चांदुर रेल्वे मध्ये मोठ्या दिमाखात आयटीआय फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी झालेल्याचे एक प्रतिष्ठान आहे .त्यांचे यशस्वी यशोगाथा खरच नवचैतन्य देणार आहे महिलांना तसेच महिला बरोबरच मुलांना सुद्धा नक्कीच मुकुंदराजे करीत असलेला उद्योग प्रेरणादायी ठरेल.
आयटीआय मध्ये तसं बघितले तर फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी हे व्यवसाय कटिंग अँड कटिंग टेक्नॉलॉजी,ड्रेस मेकिंग, ह्या व्यवसायात मुलीं करता राखीव आहे. परंतु शासनाने मुलांना पण या व्यवसायमध्ये करता यावं त्याकरिता खुले केलेल्या आहे. त्यामुळेच ह्या व्यवसायाचा निश्चितच फायदा झाला आहे असे मत व्यक्त केले आहे. त्याच्या या व्यवसायाला श्री. प्रदीप घुले सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांनी शुभेच्छासह अभिनंदन केले आहे.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkra
0 Comments