संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आई वडील जन्मजात आंधळे असलेल्यांची मुलगी रवीना यादव हिचे महावितरण मध्ये विद्युत सहायक पदावर निवड
आई वडील जन्मजात आंधळे असलेल्यांची मुलगी रवीना यादव हिचे महावितरण मध्ये विद्युत सहायक पदावर निवड हृदयाला हेलावून टाकणारे यशोगाथा
महाराष्ट्राचे उपराजधानी असलेल्या नागपूर येथील विठ्ठल नगर भागात राहणाऱ्या प्रदीप यादव व त्यांची पत्नी हे जन्मजातच आंधळे आहेत. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि आजी एकाच झोपडीत वास्तव्यास होते. त्यांच्या पोटी एक कन्यारत्न झाले तिचे नाव रवीना असे आहे. त्यांच्या व्यवसाय म्हणजे रोज गावात भिक्षा मागणे आणि पोट भरणे. मी आजपर्यंत लिहिलेल्या यशोगाथामध्ये प्रथमच हृदयाला हेलावून टाकणारी ही यशोगाथा अक्षरशः डोळ्यातून पाणी काढणारे आहे.
"जिंदगी को रंगीन कहा गया है कियोंकि यह हमें कई रंग दिखाती है। कभी जिंदगी हमें हसना सिखाती है तो कभी रोना। कभी हम हद से ज्यादा खुश होते हैं और कभी बेहद निराश। कई बार ऐसा होता है कि जी-जान से मेहनत करने के बाद भी हमें वो नहीं मिलता है जिसके हम हकदार होते हैं। कई उतार-चढ़ाव झेलने के बाद भी और खून-पसीना एक करने के बाद भी हमें मंजिल नहीं मिलती है।
रवीना ही लहानाची मोठी झाली त्यांना राहण्यासाठी घर नव्हते परंतु १७ वर्षांपूर्वी नागपूर येथील एका दानशूरांनी त्यांना एक हजार स्केअर फुट जागा दिली. रविनाचे शिक्षण नागपूर येथील आदर्श विद्या मंदीर शाळेमध्ये झाले.तिला १० वी मध्ये ८६ % मिळून घवघवीत हे संपादन केले. आपली रवीना कशी दिसते हे त्यांच्या आई-वडिलांना दिसत नसलं तरी ते स्पर्श ज्ञानाने आपल्या मुलींचे चेहरा हाताळत.
कुठल्याही प्रकारची खाजगी शिकवणी नसताना तिने खूप मोठी मजल मारली होती. आदर्श विद्यामंदिर मधील तिचे शिक्षक तिला नेहमीच मदत करायची. ती म्हणते तरी माझ्या आई-वडिलांना मी दिसली नाही तरी मी एवढं टक्केने पास झाली म्हणून ते अक्षरशः नाचलेत. मग आता पुढे काय करायचं तर आयटीआय करण्याचं ठरवलं
कोरोनाचा काळ देशात शांतता पसरलेली होती. कालचक्र पण थांबलेली होती. रवीनाचा संघर्ष अधिक तीव्र झालाअशा परिस्थितीत रवीना संपूर्ण खचलेली होती.तिला शासकीय आयटीआय मध्ये वीजतंत्री या व्यवसायाला प्रवेश मिळाले होते. परंतु कोणालाही माहीत नाही की हिचे आई-वडील आंधळे असलेल्यांची मुलगी आहे म्हणून तिला राहायला घर नाही परंतु जेव्हा संस्थेचे प्राचार्य श्री हेमंत आवारे, संस्थेतील गटनिदेशक, तिचे शिल्पनिदेशक श्री. एन.बि.सुर्यवंशी ,श्री.शिवाजी ढुमणे गटनिदेशक, तसेच महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे पदाधिकारी, यांना रविना यादवची करुन कहाणी कळताच त्यांनी अत्यंत तात्काळ 80 हजाराची निधी जमा केली. आणि स्थानिक ठेकेदाराची मदतीने घराचा दरवाजा खिडक्या बाथरूम, घरावरील रूप, आत मध्ये स्टाईल, आणि स्पर्धा परीक्षेचे पुस्तकाची संच, घरात लागणारी आवश्यक धान्य देऊन मदत केली
सन 2023 मध्ये ती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर मधून वीजतंत्री हा व्यवसाय यशस्वीरित्या पूर्ण केले. आणि 2023- 24 मध्ये महावितरण मध्ये एका वर्षाचे शिकाऊ उमेदवारी तिने पूर्ण केले. परंतु हे करीत असताना कुटुंबाला मदत म्हणून ती छोटा ताजबाग नागपूर मध्ये मोबाईल ॲक्सेसरीज विकून स्वयंरोजगार पण करीत असे.तिचा जीवनामध्ये कठीण संघर्षाला तोंड देत होती.
सोबतच आयटीआयच्या कर्मचारी वृंद, संस्थेचे प्राचार्य तिच्या मदतीला होतेच.अशाही प्रतिकूल परिस्थितीत ती 2025 मध्ये महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदावर करीता परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये यशस्वी झाली. नुकताच लागलेल्या निवड यादीमध्ये तिची निवड झाली. रवीना ही तिचे संपूर्ण यश आणि श्रेय आयटीआय नागपूर येथील सर्व स्टाफ ला देत आहे. तसेच तिचे आई-वडील आजी यांनी रवीना ला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि दाखविलेला विश्वास,हे महावितरण मध्ये विद्युत सहायक पदावर झालेली निवड ही त्यांना समर्पित करीत आहे.
रवीनाची झालेल्या निवडीबाबत विठ्ठल नगर भागातील रहिवासी, नागपूर आयटीआयतील सर्व कर्मचारी वर्ग संस्थेचे प्राचार्य तसा उपसंचालक, यांनी रवीनाच्या घरी जाऊन तिला पेढा भरून भरभरून कौतुक करीत आहे. यावेळी रवीनाच्या आनंदाने डोळे सुद्धा पानावले. आई वडील आंधळे असल्याने त्यांना आपल्या मुलीला झालेला आनंद पाहु शकत नसले तरी भावस्पर्शाने त्यांचे आनंद द्विगुणीत झालेले आहे.
एका संघर्षमय प्रवासाला आज आयटीआय केल्यामुळे आर्थिक स्थिरता मिळाली याचा फार मोठा आनंद आहे. खरंच मित्रांनो विद्यार्थ्यांनी जर मनावर घेतले ध्येय, आत्मविश्वास आणि चिकाटी , शिक्षणाची भूक असेल तर तर तो कोणत्याही परिस्थितीत आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो हे सिद्ध होते.
कु.रविना यादव हिच्या महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबाबत पी.जी.ठाकरे उपप्राचार्य ,किशोरी पंडिले मैडम उपसंचालक ,श्री. एस.एस.कुलकर्णी मैडम,जि.व्य.शि.व प्रशिक्षण अधिकारी नागपूर ,श्री.विजय लाकडे साहेब,सहसंचालक श्री .किरण मोटघरे साहेब यांनी अभिनंदन सह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कई बार ऐसा होता है कि मंजिल सिर्फ एक कदम दूर होती है मगर हम पहले ही हार मान जाते हैं। इस परिस्थिति में प्रेरित रहना, हौसला बनाए रखना और हिम्मत ना हारना बहुत जरूरी होता है। अगर आप भी ऐसे दौर से गुजर रहे हैं तो आपको हमेशा कुछ ऐसा करना चाहिए जिससे आप हर पल मोटिवेटेड रह सकें।
"वक्त से लड़कर जो नसीब बदल दे,
इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे,
कल क्या होगा कभी मत सोचो,
क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल ले"
आयटीआय मध्ये विविध प्रकारचे कोर्सेस असतात ते केल्यानंतर रोजगार व स्वयंरोजगार 100% करता येतात. तर इतर विद्यार्थ्यांना ही रवीनाची संघर्षमय कहानी निश्चितच चेतना दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हे यशोगाथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि रविना यादवला शुभेच्छा द्यायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments
रविना चे खुप खुप अभिनंदन 💐💐💐
तसेच नागपुर आय टी आय चे अधिकारी,कर्मचारी ज्यांनी तिला या बिकट परिस्थिति मध्ये मद्त केली त्या सर्वांचे सुद्धा खुप खुप अभिनंदन.
💐🌹