आयटीआय अंतरगाव येथील गौरी विजय लोहारे हिचे महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदिवासी अंतरगाव येथील कु. गौरी विजय लोहारे ही सन 2021- 23 पर्यंत वीजतंत्री हा आयटीआय मधील अभ्यासक्रम पूर्ण केले आणि 2024- 25 पर्यंत महावितरण मध्ये एक वर्ष कालावधीचे शिकवू उमेदवारी सुद्धा पूर्ण केलेले आहे
गौरीचे बारावीपर्यंत शिक्षण मोहदा येथे झाले तिला वडील नसून आईने तिचे पालकाचे जबाबदारी पुर्ण केले. खरंतर तिला इंजिनियर व्हायचे होते परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ती उच्च शिक्षण करू शकले असले नाही. तिची आई रोज मंजूरी करीत असून तिला एक बहीण आहे. शेवटी आयटीआय करण्याचे ठरवले आयटीआय करून माझ्या मुलीला एमएसईबी मध्ये नोकरी लागेल ही खास धरून तिच्या आईने जवळच असलेल्या अंतरगाव येथे आयटीआय ला प्रवेश घेऊन दिले. दोन वर्ष कालावधीच्या असलेला विजतंत्री हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यानंतर 2024 -25 पर्यंत महावितरण मध्ये एक वर्ष कालावधीचे शिकाऊ उमेदवारीचा अभ्यासक्रम पूर्ण केले त्यानंतर जून 2025 मध्ये झालेल्या महावितरणाचे परीक्ष दिली आणि त्या परीक्षेमध्ये यशस्वी झाला तिची निवड विद्युत सहाय्यक या पदावर निवड झालेले आहे.
तिचे विद्युत सहाय्यक या पदावर निवड झाल्याने तिच्या आईचा आनंद गगनात मावेन असा झाला तिच्या निवडीमुळे मोहदा परिसरामध्ये सर्वत्र तिच्यावर कौतुक आणि आनंदाचा वर्षाव हाताने दिसून येत आहे ती तिचे यशाचे श्रेय तिचे आई आणि बहीण यांना देत असून त्याचे मार्गदर्शक श्री दुर्योधन नागनवरे यांना देत आहे. तिच्या या निवडीबाबत आयटीआय अंतरगाव येथील श्रीमती उषा त्रिपाठी प्राचार्य मॅडम,श्री.हेंमत दोड,तसेच श्री गजानन राजूरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन केले आहे
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments