Advertisement

Success Story आयटीआय बीड येथिल दादासाहेब भगत पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ऊस तोडी कामगाराचा मुलगा झाला दोन कोटीचा मालक

आयटीआय बीड येथिल दादासाहेब पांडुरंग भगत पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ऊस तोडी कामगाराचा मुलगा झाला दोन कोटीचा मालक-Success Story 

Success Story आयटीआय बीड येथिल दादासाहेब भगत पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ऊस तोडी कामगाराचा मुलगा झाला दोन कोटीचा मालक

नमस्कार मित्रांनो आज परत एक सक्सेस स्टोरी लिहिताना अतिशय म्हणाला आनंद आहे. आता 100% टक्के खात्री झाले की आयटीआय केल्यानंतर कुठल्याच विद्यार्थी रिकामा राहू शकत नाही. "हौसले बुलंद होना चाहिए बस! 

“अगर आप किसी चीज को चाहतें है तो सारी कायनात उसे पाने में आपकी मदद करने लगती है.”  घरी अठरा विश्व दारिद्र्य टिन पत्र्याचा घर आई वडिलांचा ऊस तोडीचा व्यवसाय त्यामुळे दरवर्षी सहा महिने गावाच्या बाहेर राहावे लागत होते. दादासाहेब भगत यांची कहाणी ही ग्रामीण भागातून येणाऱ्या एका तरुणाची आहे, ज्याने मोठं स्वप्न पाहिलं आणि अपार मेहनतीने ते पूर्ण केलं. बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले दादासाहेब आर्थिक अडचणींमुळे केवळ दहावीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. त्यानंतर त्यांनी आयटीआय करायचे ठरवले दादासाहेब भगत हा सावंगी पाटण तालुका आष्टी जिल्हा बीड येथील रहिवासी असून 2006 -2007 वर्षी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  बीड जिल्हा बीड येथे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक हा एक वर्षाचा व्यवसाय त्यांनी केला.  आयटीआय यशस्वी त्या पास झाल्यानंतर सुरुवातीला याझाकी कंपनीत ₹4500 पगारावर काम  केलं.

दादासाहेबांचे आई-वडील चे आर्थिक परिस्थिती बेताची होती तो 14 -15 वर्षाचा असताना लोकांच्या शेतामध्ये विहिरी खोदणे, ट्रॅक्टर रेती भरणे, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणे आई-वडिलांसोबत ऊस कटाई,तसेच कन्स्ट्रक्शनच्या साईटवर सुद्धा ट्रॅक्टर वर माती भरण्यासाठी 80 रुपये रोजंदारी वर  काम केलेला आहे.

थोड्या काळाने ते इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसवर ऑफिस बॉय म्हणून ₹9000 पगारावर काम करू लागले. दिवसभर काम करून ते रात्री अ‍ॅनिमेशन आणि डिझाईनचे क्लासेस करत होते. हळूहळू त्यांना डिझाईन, प्रोग्रामिंग यामध्ये रस वाटू लागला. पुढे त्यांनी मुंबई आणि हैदराबादमध्ये काम करत C, Python यांसारख्या भाषांमध्ये कौशल्य विकसित केलं.

2015 मध्ये झालेल्या एका अपघातामुळे ते काही काळ घरीच होते, तेव्हा त्यांनी डिझाईन टेम्प्लेट्स तयार करून विक्री सुरू केली. त्यातूनच त्यांनी 'Ninthmotion' ही डिझाईन फर्म सुरू केली. BBC Studios, 9XM यांसारख्या ग्राहकांसोबत त्यांनी काम केलं आणि कंपनीने 2019 पर्यंत 48 लाखांचा टर्नओव्हर गाठला.

कोविड काळात पुण्यातील ऑफिस बंद करून त्यांनी आपल्या गावातील गोठ्याला ऑफिसमध्ये रूपांतरित केलं. याच काळात त्यांनी ‘DooGraphics’ हे ग्राफिक डिझाईन प्लॅटफॉर्म सुरू केलं, जे Canva प्रमाणे काम करतं. हे AI-आधारित टूल असून ते वापरायला अगदी सोपं आहे. अवघ्या सहा महिन्यांत त्यावर 10,000+ वापरकर्ते झाले आणि हे वापरकर्ते केवळ भारतात नव्हे, तर जपान, ऑस्ट्रेलिया, यूके इथून होते.

2024 मध्ये दादासाहेब 'Shark Tank India' सिझन 3 मध्ये सहभागी झाले. त्यांनी डूग्राफिक्ससाठी पिच सादर केलं आणि त्यांची मेहनत पाहून अमन गुप्ता (boAt कंपनीचे सह-संस्थापक) यांनी ₹1 कोटीची गुंतवणूक करत कंपनीतील 10% हिस्सेदारी घेतली. सध्या त्यांच्या कंपनीचे मार्केट व्हॅल्यू ₹10 कोटींहून अधिक आहे.

दादासाहेब भगत यांची कहाणी दाखवते की शिक्षण अपूर्ण असलं तरीही जर आत्मविश्वास, जिद्द आणि सतत शिकण्याची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ग्रामीण भागात राहूनही जागतिक स्तरावर पोहोचता येतं, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.

दादासाहेब भगत यांनी कॅनवा सारखा ऑनलाईन ग्राफिक डिझाईन प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार केला. दुसरे स्टार्टअप DooGraphics सुरू केले. या प्लॅटफॉर्मवर वरून युजर्स आपले टेम्प्लेट आणि डिझाईन बनवू शकते. 

दादासाहेब the better India सोबत चर्चा दरम्यान त्यांच्या शेतामध्ये एक टिन शेड ची गोठा होता त्या गाय बैलाच्या गोठ्यामध्ये गावातील तीन युवकासोबत त्यांनी काम सुरू केले. परंतु कामाचा व्याप वाढल्यामुळे त्या ठिकाणातील जनावरांची व्यवस्था दुसरीकडे करून ती जागा या कामासाठी वापरू लागले हळूहळू गावातील युवकांमध्ये रुची निर्माण केले आणि त्यांच्यामध्ये शिकण्याची इच्छा निर्माण केले.

त्यांच्या टिनछप्पर मध्ये सुरू केलेली कंपनी सहा महिन्यांमध्ये 10000 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर्स झाले. दादासाहेब जवळ महाराष्ट्र ,दिल्ली, बेंगलोर ,जपान, ऑस्ट्रेलिया, UK वरून क्लाइंट मिळू लागले .

देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी दादासाहेब भगत "मन की बात "या कार्यक्रमांमध्ये त्यांची कौतुक केले. आणि दादासाहेब भगत ची कहाणी आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी असल्याचे म्हटले.

केवळ १० पास असलेल्या दादासाहेब भगत यांनी आयटीआय पंप मेकॅनिकल कम ऑपरेटर झाल्यानंतर त्यांनी संगणकाचे ज्ञान अवगत केले. आज त्याची स्वतःची दोन कंपनी असून दोन कोटीच्या वर वार्षिक उलाढाल आहे. त्याच्या या यशस्वी वाटचालीकरिता आयटीआय परिवाराकडून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्याचे अभिनंदन

आयटीआय पास असलेले आणि आयटीआय करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांची करीत आहे खरंच प्रेरणादायी सक्सेस स्टोरी असून निश्चितच तुम्हाला या दादासाहेब पासून प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करतो.

"जीत गर मेहनत की हो तो पूरी कायनात जश्न मनाती है, और यूंहीं नहीं मंजर मिल जाते, मंजिल पाने को रातों की नींदें गंवानी पड़ती हैं!"

  • ठोकरें लगने से चलना सीखते हैं, और हार कभी-कभी जीत का रास्ता दिखाती है.
  • मेहनत से बड़ी कोई पूजा नहीं और जो दिल से मेहनत करता है, उसका कोई सपना अधूरा नहीं रहता.
  • काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए,
    हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए,
    यहां जिंदगी तो हर कोई काट लेता है,
    जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए।


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod



Post a Comment

0 Comments