Advertisement

नवीन तंत्रज्ञान, नव्या कल्पना – अमरावती विभागीय तंत्र प्रदर्शन 2026

 नवीन तंत्रज्ञान, नव्या कल्पना – अमरावती विभागीय तंत्र प्रदर्शन 2026

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), अमरावती येथे  दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती विभागीय तंत्र प्रदर्शन 2026 मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनामध्ये अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतील आयटीआय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली तांत्रिक कौशल्ये आणि नवकल्पना सादर केल्या.

या प्रदर्शनात Engineering, Non-Engineering तसेच New Technology Based Model Group मधील विविध मॉडेल्स मांडण्यात आली. कृषी, आरोग्य, औद्योगिक व इलेक्ट्रिकल क्षेत्राशी संबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे आयोजन उपसंचालक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. परीक्षकांनी उत्कृष्ट मॉडेल्सची निवड करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर केले.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कौशल्याला चालना देणारा हा उपक्रम भविष्यातील तांत्रिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरला.

अमरावती विभाग – Engineering Group Models

आयटीआय विद्यार्थ्यांची तांत्रिक कामगिरी

अमरावती विभागातील आयटीआय संस्थांच्या इंजिनिअरिंग गटातील विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण व तांत्रिक मॉडेल्स सादर करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मॉडेल्समधून विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य, उद्योगाभिमुख दृष्टिकोन आणि नवकल्पना स्पष्ट दिसून येतात.

प्रथम क्रमांक

📍 जिल्हा – बुलढाणा

🏫 शासकीय आयटीआय, मेहकर ट्रेड: Welder

मॉडेल नाव: UPNER YANTR System

सहभागी विद्यार्थी: रोहित जाधव ,सय्यद परवेज

प्रशिक्षक: G.S. Dhote 

🥈 द्वितीय क्रमांक

📍 जिल्हा – यवतमाळ

🏫 शासकीय आयटीआय, यवतमाळ ट्रेड: Mechanic Motor Vehicle

मॉडेल नाव: Vehicle Breakdown Recovery System

सहभागी विद्यार्थी: खुशी गोले ,चेतन काळे,हर्षदीप धेपे

प्रशिक्षक: Pratik Rathod 

🥉 तृतीय क्रमांक

📍 जिल्हा – अमरावती

🏫 GITI, चिखलदरा ट्रेड: Wireman

मॉडेल नाव: Circuit Breaker

सहभागी विद्यार्थी: कृष्णकांत बेलपत्रे 

प्रशिक्षक: Ku. Shubhangi Jawarkar

अमरावती विभाग – Non-Engineering Group

विभागनिहाय निवड झालेली मॉडेल्स

अमरावती विभागातील आयटीआय संस्थांच्या Non-Engineering गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेल्सनी सर्जनशीलता, कौशल्य आणि समाजोपयोगी दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. ड्रेस डिझाइनिंगपासून कॉस्मेटोलॉजीपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली गेली.


🥇 प्रथम क्रमांक

📍 जिल्हा – यवतमाळ

🏫 शासकीय आयटीआय, दिग्रस ट्रेड: Dress Making

मॉडेल नाव: Collection of Designer Dresses

सहभागी विद्यार्थीनी: मोहिनी राठोड

👉 आधुनिक फॅशन ट्रेंड्स लक्षात घेऊन आकर्षक व सर्जनशील डिझायनर ड्रेसचे कलेक्शन सादर करण्यात आले.


🥈 द्वितीय क्रमांक

📍 जिल्हा – यवतमाळ

🏫 शासकीय आयटीआय, पांढरकवडा ट्रेड: Cosmetology

मॉडेल नाव: Herbal Product

सहभागी विद्यार्थीनी: मनीषा पवार,चकुली गटलेवार,आकांक्षा मंगाम,लावण्या उमाटे

प्रशिक्षक: सौ.करूणा सुधीर बनसोड ( carft Instructor Cosmetology)

👉 नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या हर्बल उत्पादनांनी आरोग्य व सौंदर्य क्षेत्रात उपयुक्तता दाखवली.


✨ Non-Engineering Group ची वैशिष्ट्ये

  1. सर्जनशीलता व कलात्मक कौशल्याचा विकास

  2. लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी

  3. स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर

  4. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना

    New Technology Based Model Group मधील निवड झालेले मॉडेल्स

    अमरावती विभागातील आयटीआय विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण मॉडेल्स सादर करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कृषी, आरोग्य व औद्योगिक क्षेत्रात उपयोगी पडतील अशी ही मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.

    New Technology Based Model Group (Region: Amravati)



    क्र.जिल्हाआयटीआय नावट्रेडमॉडेल नावसहभागी विद्यार्थीक्रमांक
    1बुलढाणाशासकीय आयटीआय, देऊळगाव राजाFitterAll in One Automatic Agri Equipmentसोहम पवार, हर्षल पडघाणप्रथम
    2वाशीमशासकीय आयटीआय, वाशीमWelderStretcher + Wheel Chairशाहबाज खान पठाण, रोहित जी. शिंदे, प्रदीप बी. मोरेद्वितीय
    3बुलढाणाशासकीय आयटीआय, खामगावWelderPortable Welding Machineसिद्धांत वाय. सुर्वे, आनंद एन. नागरे, मनोज एस. सपकाळतृतीय

    या गटाची वैशिष्ट्ये

    1. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

    2. समाजोपयोगी व उद्योगाभिमुख संकल्पना

    3. प्रत्यक्ष उपयोगात येणारी मॉडेल्स

    4. विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनांना प्रोत्साहन


    निवड झालेल्या सर्व विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. आणि सौ.एस.एन.ठोंबरे उपसंचालक, संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती, श्री. आर. डी .मुळे जिल्हा व्यवसाय शिक्षण उपशिक्षण अधिकारी अमरावती, यांनी विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि त्यांचे मनोबल वाढविले. तसेच व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती येथील सहसंचालक मा. अनंत सोमकुवर यांनी अभिनंदन सह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

    🌐 Website:
    https://www.nkrathod.in

    📘 Facebook:
    https://www.fb.com/nkrathod.in

    🐦 Twitter (X):
    https://www.twitter.com/nkrathod_in

    📸 Instagram:
    https://www.instagram.com/nkrathod.in

    📢 Telegram Channel:
    https://t.me/itiupdate

    ▶️ YouTube:
    https://www.youtube.com/nkrathod


    ✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

    ✔ ITI प्रवेश माहिती
    ✔ परीक्षा व निकाल अपडेट
    ✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
    ✔ नोकरी व रोजगार संधी
    ✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

    📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!


Post a Comment

0 Comments