Advertisement

आयटीआय पांढरकवडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

 

आयटीआय पांढरकवडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

(विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर)

आयटीआय पांढरकवडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

वीर लक्ष्मण नायक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा येथे मा. मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून दिनांक 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व विज्ञानाबद्दल सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्पनिदेशक श्री. एन. के. राठोड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रदीप सोमनकर तर महिला प्रतिनिधी म्हणून कु. वैष्णवी कुबड्या या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या प्रमुख वक्त्या म्हणून बायो सायन्स अकॅडमीच्या संचालक तथा लेखिका डॉ. प्रीती त्र्यंबकराव तोटावर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यांच्या संशोधनकार्याचा आणि ‘रमण परिणाम’ या महत्त्वपूर्ण शोधाचा थोडक्यात आढावा घेण्यात आला.

आयटीआय पांढरकवडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा


संस्थेच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आकाश सोनोने यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारण्याचे आवाहन केले.

डॉ. प्रीती तोटावर यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. विज्ञान व अंधश्रद्धा यामधील फरक उदाहरणांसह सांगून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारसरणी, जिज्ञासा आणि नवसर्जनशीलतेची भावना निर्माण झाली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. दीपाली कोल्हे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गणेश फुटाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत घेण्यात आले व कार्यक्रमाची औपचारिक सांगता करण्यात आली.

आयटीआय पांढरकवडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाला असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संस्थेचा मानस व्यक्त करण्यात आला.


📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!

 


Post a Comment

0 Comments