Advertisement

अमरावती विभागीय तंत्र प्रदर्शन 2026 मध्ये ITI राहटगावचा “Fresh Food Pharmacy” प्रकल्प ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

अमरावती विभागीय तंत्र प्रदर्शन 2026 मध्ये ITI राहटगावचा “Fresh Food Pharmacy” प्रकल्प ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

दि. 27 फेब्रुवारी 2026 | अमरावती

अमरावती विभागीय तंत्र प्रदर्शन 2026 मध्ये ITI राहटगावचा “Fresh Food Pharmacy” प्रकल्प ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, अमरावती तर्फे आयोजित विभागीय तंत्र प्रदर्शनी 2026 मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) राहतगाव येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला “Fresh Food Pharmacy Project” विशेष चर्चेचा विषय ठरला. “Eat Healthy, Stay Healthy” या मूलमंत्रावर आधारित या प्रकल्पाने उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.



🍲 “Fresh Food Pharmacy” म्हणजे काय?

“Fresh Food Pharmacy” ही संकल्पना आरोग्यदायी, पोषणमूल्ययुक्त आणि ताज्या अन्नावर आधारित आहे. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे प्रभावीपणे मांडले:

  1. अन्न आणि आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध

  2. नैसर्गिक घटकांचे महत्त्व

  3. आधुनिक जीवनशैलीत संतुलित आहाराची गरज

  4. पारंपरिक पौष्टिक पदार्थांचे आरोग्यदायी फायदे

स्टॉलवर सादर केलेल्या Traditional Healthy Dishes हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले.


👨‍🍳 प्रकल्प सादर करणारे प्रशिक्षनार्थी

Craftsman Food Production व्यवसायातील प्रशिक्षनार्थी

  1. रोहित सुधीर पळसपगार

  2. मोहम्मद साकिब अब्दुल रहीम

या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण आत्मविश्वासाने केले. त्यांच्या मांडणीतील स्पष्टता, सर्जनशीलता आणि तांत्रिक गुणवत्ता यांचे सर्वांनी कौतुक केले.


🎖 मान्यवरांची भेट

प्रदर्शनीचे उद्घाटक सहसंचालक मा. श्री सोमकुवर साहेब, उपसंचालक मा. ठोंबरे मॅडम तसेच श्री राम मुळे सर यांनी स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.


🌟 विभागीय स्तरावर उमटलेले यश

या यशस्वी सादरीकरणामुळे ITI राहटगावच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा, सर्जनशीलतेचा आणि तांत्रिक गुणवत्तेचा ठसा विभागीय पातळीवर उमटला आहे. हा प्रकल्प केवळ तांत्रिक उपक्रम नसून समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा अभिनव प्रयत्न ठरला आहे.

आरोग्य आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम भविष्यातील कौशल्याधारित शिक्षणासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरेल.

📢 आयटीआय संबंधित अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा 👇

🌐 Website:
https://www.nkrathod.in

📘 Facebook:
https://www.fb.com/nkrathod.in

🐦 Twitter (X):
https://www.twitter.com/nkrathod_in

📸 Instagram:
https://www.instagram.com/nkrathod.in

📢 Telegram Channel:
https://t.me/itiupdate

▶️ YouTube:
https://www.youtube.com/nkrathod


✅ आयटीआय बद्दल सर्व काही – एका क्लिकवर!

✔ ITI प्रवेश माहिती
✔ परीक्षा व निकाल अपडेट
✔ NCVT प्रमाणपत्र माहिती
✔ नोकरी व रोजगार संधी
✔ लेटेस्ट ITI अपडेट्स

📌 संपूर्ण आयटीआय माहिती – एकाच ठिकाणी!



Post a Comment

0 Comments