BTRI यवतमाळ येथे जिल्यातील सर्व आयटीआय शिकाऊ उमेदवारी योजना समन्वयक यांचे करिता एक दिवसीय कार्यशाळा संपन्न -महेशकुमार दयानंद सिडाम
महेशकुमार दयानंद सिडाम |
BTRI यवतमाळ येथे जिल्यातील सर्व आयटीआय शिकाऊ उमेदवारी योजना समन्वयक यांचे करिता एक दिवसीय कार्यशाळा.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, द्वारा BTRI यवतमाळ जिल्हा यवतमाळ येते जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिकाऊ उमेदवारी योजना समन्वयक यांचे करिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन श्री महेशकुमार दयानंद सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी केले. तर कार्यशाळेचे अध्यक्ष अतिथी म्हणून संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे हे उपस्थित होते. तर अतिथीम्हणून सौ अपर्णा आगरकर हे होत्या.या प्रसंगी मान्यवरांचे बी. टी. आर .आय .च्या आयटीआय यातील शिकाऊ उमेदवारी योजना समन्वयक यांना नवचेतना मिळावी , त्यांना काम करण्यास स्फूर्ती मिळावी याकरिता 'मन का विश्वास कमजोर होना' या प्रार्थनाने कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.
श्री महेशकुमार दयानंद सिडाम , जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यामध्ये रोज शिकाऊ उमेदवारी योजना ,आणि रोजगार वाढावा तसेच यवतमाळ जिल्ह्यातील आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळावा या हेतूने कार्यशाळेचे तालुक्यातील आयटीआय मधील समन्वयक यांनी प्रयत्न करावा. असे यावेळी आवाहान करण्यात आले.
व्यासपीठावरील मान्यवर |
या कार्यशाळाचे दोन टप्प्यांमध्ये आयोजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये सौ अपर्णा आगरकर, कनिष्ठ प्रशिक्षणार्थ्यी सल्लागार यांनी आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी कसे करावी . तसेच आस्थापना रजिस्ट्रेशन बाबत डिजिटल लायझेसन बाबत संपूर्ण माहितीचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले.
सौ अपर्णा आगरकर, कनिष्ठ प्रशिक्षणार्थ्यी सल्लागार माहिती देतांना |
तर दुसरा टप्पामध्ये संस्थेचे प्राचार्य श्री प्रमोद भंडारे यांनी 1961 चा शिकाऊ उमेदवारी कायदा , आस्थापना नव्याने नोंदणी करतांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे., जागा स्थित करून 100% शिकाऊ उमेदवारी साठी प्रत्यक्ष प्रयत्न करने तसेच NAPS योजना बाबत मार्गदर्शन केले.
उपस्थित समन्वयक |
संस्थेतील एक दिवसीय शिकाऊ उमेदवारी योजना समन्वयक कार्यशाळे करिता दिग्रस, दारव्हा, नेर, राळेगाव, कळंब ,वणी, मारेगाव , पांढरकवडा , घाटंजी व झरी जामणी येथील समन्वयक उपस्थित होते. कार्यशाळेचे समारोप दिलीप अंबाडरे यांनी केले. श्री.पांडुरंग कवडे यांनी अथक परिश्रम घेतले.
माहिती संकलन-श्री.एन.के.राठोड सर आयटीआय पांढरकवडा
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkratho
0 Comments