आयटीआय यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथील इलेक्ट्रिशियन ट्रेडचा प्रशिक्षणार्थी पांडुरंग जाधव झाले यशस्वी उद्योजक
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथे इलेक्ट्रिशियन ट्रेड करून झाला उद्योगपती
प्रत्येक यशोगाथा सक्सेस स्टोरी ही रोमांचक असते.भावपुर्व वाचन केल्यास नक्कीच त्यांच्या पासून आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.आयटीआय ची किंमत तुम क्या जानो साहेब आयटीआय तो आयटीआय होता है!बस समजा जरुरी है! मुझे क्या करना चाहिए?
सध्या स्थितीचा विचार केल्यास राज्यातील आयटीआय प्रवेश क्षमता ही १४५३५६ इतकी आहे.आणि कंपनीला दरवर्षी दोन लाख मनुष्य बळ लागते.पंरतु व्यवसाय स्वयंरोजगारासाठी फारचं कमी आयटीआय प्रशिक्षणार्थी यांचे विचार करतो. तर आज आपण अश्याच एका आयटीआय इलेक्ट्रिंशियन करून कसा यशस्वी कंपनीचा मालक झाला. उद्योजक झाले यावर प्रकाश टाकणारा आहोत.
जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता यारो? पांडुरंग जाधव यांच्या जन्म आर्णी तालुक्यातील छोट्या खेड्यात झाले.त्यांचे वय वर्षे ३ असतांनाच वडील स्वर्गवासी झाले.त्यावेळी आईच्या गर्भात दुसऱ्या मुलांचं पदार्पण केले होते.काही दिवसांनंतर आमच्या घरी माझ़्या बहीणीचे पदार्पण झाले.पांडुरंग जाधव यांच्या आई वडील रोज मजुरी करायचे.एकीकडे दुःखाचे डोंगर तर दुसरीकडे बहीनीचे आगमन होते.असे आम्ही दोघे माझ़्या आईने बाबांची माया पुरवीत होते.दिवसागणिक आम्ही दोघे भाऊ व बहीण लहानाचं क़धी मोठी झालो काहीच समजले नाही.
बघता बघता पांडुरंग जाधव दहावी पास मोठ्या उमेदीने झाला.पंरतु बहीण जास्त शिकली नाही.आईनं माझ़्या पांडुरंग लवकर मोठा हो तो सुद्धा खुप शिकावं अशी आईची भूमिका होती.पंरतु आईच्या रोजमजुरी जोरावर बारावीपर्यंत तग धरून होते.आता शिक्षण करायचे नाही तर नौकरी च्या शोधत मुंबई येथे पलायन केले .आणि दोन ते तीन दिवस नौकरी शोधण्यासाठी गेले.रस्यावर झोपुन दिवस काढले.आणि फुटपाथवर वरील पुस्तकांची विक्री करण्याचे काम मिळाले.मिळेल ते काम करून मुंबईत दिवस काढत असताना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कंपनीत काम शोधूनही फायदा झाला नाही.तर ते आयटीआय असेल तर बोल.म्हणजे आयटीआय असेल तर नौकरी त्यामुळे मला आयटीआय ची महती कळली.आणि मुंबई वरून यवतमाळ येथे परतीचा प्रवास सुरू केला.
आयटीआय मध्ये प्रवेश मिळण्यासाठी भटकंती केली.आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथे इलेक्ट्रिशियन ट्रेड ला नंबर लागले एकदाचं.त्यावेळी श्री.हिंगवे सर मला शिकवायला होते. पांडुरंग जाधव यांनी सन 1980-1982 मध्ये आयटीआय इलेक्ट्रिंशियन यशस्वीपणे पास झाले.त्यानंतर आर्णी येथील ३३ केव्ही मध्ये अॅप्रेटिशिप करीता निवड झाली.आणि एक वर्ष आयटीआय नंतरच्या अभ्यासक्रम पूर्ण केला.पंरतु एमएसईबी मध्ये नौकरी करण्याची मानसिकता तयार नव्हते.
सारखं वाटतं असे की कोणते व्यवसाय करायचा आणि कुठं जायचं कोणाच्या मार्गदर्शनात काम करायचे.काही सुचत नव्हतंत्यावेळी विद्युत कंत्राटदार यांच्या कडे काम करायचे धाडस केले.कामाला सुरुवात केली.पण पांडुरंग जाधव यांच्या मन काही कुठेही लागत नव्हते.हे काम करीत असताना पुणे येथे डिप्लोमा करण्यासाठी शासकीय तंत्र दुर शिक्षण म्हणजेच करस्पाँडंट डिप्लोमा, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअर DEE करावे अशी मनोमन इच्छा झाली.आणि पुणे येथे डिप्लोमा करण्यासाठी प्रवेश मिळविला.
अशा प्रकारे डिप्लोमा पूर्ण झाल्यामुळे सुपर वायझर इलेक्ट्रिकल कंत्राटदार चा परवाना प्राप्त करून आत्मविश्वास संपादन केले. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही.मग पांडुरंग जाधव हा इलेक्ट्रिकल कामात परीपुर्ण झाले होते.आणि पाहता पाहता कामाला गती मिळाली.आणि महाराष्ट्र राज्य सह इतर ही राज्यातील इंडस्ट्रियल कामे करू लागले.आणि त्यांच्या कडे एक दोन नव्हे तर विस इंजिनिअर काम करून लागले आणि बघता बघता २५० कामगारांना रोजगार दिला.
तरी मनाला शांती नव्हते.अजुन काही तरी नवीन करायचं असं वाटतं होतं.त्याकरीता ३४ वेगवेगळ्या देशांत जाऊन सेमिनार,एक्जुबिशन ला भेट दिली.आणि अखेर सन 2009 मध्ये आपल्या भारतामधुन १७ तज्ञांचे विदेशात सोलर एनर्जी अभ्यास दौरा केन्द्र सरकार नी आयोजन केले.त्यातील एक तज्ञ पांडुरंग जाधव यांचे मित्र निघाले आणि त्यांनी त्यांना विनंती करून त्यांच्या सोबत सहखर्चाने विदेशात सोलर एनर्जी अभ्यास दौरा करीता राजी केले.
आणि पांडुरंग जाधव यांच्या स्वप्नातील व्यवसायाला आकार आले.सन २०१० साली Solar Power Project Consultant And LargeScale Project Finance Advise .औरंगाबाद येथे उद्योग उदयास आले.
संस्थेचे प्राचार्य श्री प्रमोद भंडारे यांनी फोन करून श्री.पांडूरंग जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच श्री.महेशकुमार दयानंद सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी सुध्दा जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
1 Comments