ITI यांत्रिक मोटर वेहिकल (MMV) –(Mechanic Motor Vehicle –) – कौशल्यावर आधारित उज्ज्वल करिअर
यांत्रिक मोटार गाडी (Mechanic Motor Vehicle – MMV) ट्रेड
आपल्याला ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये करिअर करायचा आहे ?तर चला जाणून घेऊया यांत्रिक मोटर गाडी व्यवसाय विषयावर माहिती
आपण दहावी पास आहात आयटीआय मध्ये कोणता कोर्स करायचे आपल्याला माहिती नसते. सी टी एस अंतर्गत मेकॅनिक मोटर वेहिकल ट्रेड हा आयटीआय च्या नेटवर्क व्दारे देशभरात वितरित केल्या जाणाऱ्या लोकप्रिय अभ्यासक्रमापैकी एक आहे हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे.
1) अभ्यासक्रमाचा कालावधी -२ वर्षे
हा ट्रेड NCVT (National Council for Vocational Training) मान्यताप्राप्त आहे.
2) शैक्षणिक पात्रता
किमान १० वी उत्तीर्ण
वय: किमान 16 वर्षे असावे.
3) अभ्यासक्रमातील विषय
या ट्रेडमध्ये मोटार गाडी दुरुस्ती, सर्व्हिसिंग व देखभाल याचे प्रॅक्टिकल व थिअरी शिकवले जाते.
मुख्य विषय:
इंजिनचे प्रकार (पेट्रोल, डिझेल, CNG, इलेक्ट्रिक वाहनांची माहिती)
इंजिनचे ओव्हरहॉलिंग
गिअर बॉक्स, क्लच, ब्रेक सिस्टीम, सस्पेन्शन
इंधन प्रणाली (Fuel System)
ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स
चेसिस आणि बॉडी रिपेअर
वेल्डिंग, कटिंग, फिटर वर्क
संगणकावर डायग्नोस्टिक स्कॅन टूल्स वापरणे
रोड टेस्ट व ट्रबलशूटिंग
4) प्रॅक्टिकल ट्रेनिंग
वर्कशॉपमध्ये वाहन उघडणे-बसवणे, भाग बदलणे
सर्व्हिसिंग, ग्रीसिंग, ऑइल चेंज
टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट्सचा वापर
डायग्नोस्टिक मशीनद्वारे फॉल्ट शोधणे
5) नोकरीच्या संधी
MMV ट्रेड पूर्ण केल्यानंतर खालील क्षेत्रात संधी मिळते:
मोटार गॅरेज, सर्व्हिस सेंटर, वर्कशॉप
ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (Tata, Mahindra, Maruti, Bajaj, Hero इ.)
ऑथोराइज्ड सर्व्हिस स्टेशन (Hyundai, Honda, Toyota, इ.)
रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, ST वर्कशॉप्स
खाजगी ट्रॅव्हल्स / लॉजिस्टिक कंपन्या
6) स्व-रोजगार संधी
स्वतःचे गॅरेज / वर्कशॉप सुरू करता येते.
स्पेअर पार्ट्स शॉप उघडता येते.
फ्रीलान्स मेकॅनिक म्हणून काम करता येते.
7) पुढील शिक्षणाच्या संधी
MMV आयटीआय नंतर:
- अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (१ वर्ष, उद्योगात प्रत्यक्ष अनुभव)
- डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ( एंट्री, २ वर्षे)
- ITI + NTTF / CTI मध्ये Instructor Training
- Automobile Technician / Service Engineer म्हणून पुढील पदवी शिक्षण
8) पगार / उत्पन्न
सुरुवातीला: ₹८,००० – ₹१५,०००/महिना
अनुभव मिळाल्यानंतर: ₹२०,००० – ₹३०,०००/महिना
स्वतःचे गॅरेज असेल तर उत्पन्न अजून जास्त होऊ शकते.
व्यवसाय करण्याच्या संधी
- स्वतःचा गॅरेज सुरू करणे – दुरुस्ती, सर्व्हिसिंग, इंजिन वर्क.
- स्पेअर पार्ट्स शॉप – गाडीचे सुटे भाग विक्री.
- बॅटरी / टायर / ऑइल सर्व्हिस सेंटर सुरू करणे.
- टू-व्हीलर, थ्री-व्हीलर, फोर-व्हीलर रिपेअरिंग वर्कशॉप सुरू करणे.
- वाहन तपासणी (Vehicle Inspection) व सर्व्हिसिंग सेंटर.
- मोबाइल मेकॅनिक सर्व्हिस – ग्राहकांच्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करणे.
ITI यांत्रिक मोटर वेहिकल (MMV) – भविष्यातील ऑटोमोबाईल एक्स्पर्ट बना"
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments