Advertisement

आयटीआय अमरावती येथील कु.वसुधा फरांदे मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स हिचे मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरीता निवड

आयटीआय अमरावती येथील कु.वसुधा फरांदे मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स हिचे मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरीता निवड

अमरावती येथील कु.वसुधा फरांदे मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स हिचे मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरीता निवड

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती जिल्हा अमरावती येथील कुमारी वसुधा फरांदे ट्रेड (मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स) मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरीता निवड वसुधा फरांदे यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केला आणि वडिलांचे सांगण्यावरून आयटीआय मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडर्स 2008 -2010 मध्ये प्रवेश घेतला.

तिचे वडील हायस्कूल शिक्षक आहे तर आई  जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका असून मुलींनी वसुंधा ही आयटीआय  करावं अशी त्यांची इच्छा होती.त्यामुळे  जुलै 2008 मध्ये आयटीआय अमरावती मध्ये प्रवेश घेतले इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा दोन वर्षाचा ट्रेड असून 2010 जुलैमध्ये ती आयटीआय उत्तीर्ण झाली.त्यानंतर जुलै 2010-2011 मध्ये आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर ओनिडा प्रा. लि. कंपनी मुंबई येथे 2010-2011  मध्ये अप्रेंटीशीप हा शिकाऊ उमेदवारीचा एक वर्षाचा ट्रेनिंग पूर्ण केला आणि चांगल्या गुणांनी पास झाली.

अमरावती येथील कु.वसुधा फरांदे मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स हिचे मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरीता निवड

पुढे तिला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा झाली आणि आयटीआय शिल्पनिदेशकाची नोकरी करायची म्हणून तिला तिचे मार्गदर्शक श्री रवि दांडगे सरांनी मार्गदर्शन करून सन 2013 -14 मध्ये सी टी आय मुंबई येथे प्रवेश मिळविला आणि सी टी आय मुंबई मधून 2014 मध्ये ती यशस्वीरित्या एक वर्षाचा निदेशकाचा डिप्लोमा पूर्ण केला

 कु. वसुधा अशोक फरांदे यांनी 2008 ते 14 या कालावधीत टेक्निकल प्रशिक्षण पूर्ण करून घेतले त्यानंतर बीए पर्यंतचे शिक्षण 2017 पर्यंत केले मग शिक्षण पूर्ण करून शिक्षणाची आवड असणाऱ्या वसुधाने एमए बीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केले अशा प्रकारे तिने खालील प्रमाणे शिक्षण घेतले .

1) एसएससी 2) आयटीआय 3) अप्रेंटीशीप 4) सी टी आय. 4) बी.ए 5) .एम .ए. 6) बि.एड.

आणि नंतर तिला  नोकरीची वेध लागले मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरिता जागा निघाल्या त्या ठिकाणी  तिने फॉर्म भरला आणि मेट्रोची परीक्षा पास करून मेट्रो मुंबई करिता  तिची निवड झाली तसेच तिला मुंबईला राहण्याचा सराव झालेला होता कारण ती ओनिडा कंपनीमध्ये अप्रेंटीशीप पूर्ण केलेली होती त्यामुळेच तिने मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे निश्चित केले.

अमरावती येथील कु.वसुधा फरांदे मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स हिचे मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरीता निवड

 मित्रांनो अतिशय जिद्दी मुलगी उच्च शिक्षण घेऊन आयटीआय (मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स ) हा आयटीआयतील दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे वसुधाला एम. ए. बी .एड मुळे नाही तर केवळ आयटीआय केल्यामुळे मुंबई मेट्रो सारख्या कंपनीमध्ये टेक्निशियन पदावर ते काम करत असल्याचा तिला अभिमान आहे वसुधा म्हणते की माझे आयटीआय केल्यामुळे करिअर घडले

वसुधाचे आई-वडील उच्च शिक्षित असून त्यांनी तिला आवडेल ते शिक्षण घेण्याचे तिला मुभा दिली आणि शिक्षणासाठी प्रेरणा दिली त्यामुळेच  तीच्या मनाप्रमाणे शिक्षण पूर्ण केले आणि आयटीआय करून मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन ची नोकरी लागल्याने तिचे आई-वडील समाधानी आहे असे मत वसुधाने व्यक्त केले.

अमरावती येथील कु.वसुधा फरांदे मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स हिचे मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन पदाकरीता निवड
श्री. रवी  दांडगे सर शिल्पनिदेशक मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आयटीआय अमरावती 

 वसुधा फरांदे हया तिच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील आणि तिचे प्रशिक्षक तिला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री. रवी  दांडगे सर शिल्पनिदेशक मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आयटीआय अमरावती यांना देत आहेत.म्हणून विद्यार्थी मित्रांनो आयटीआय चा कोणताही कोर्स करा रोजगार आणि स्वयंरोजगार हे शंभर टक्के आहे यावरून सिद्ध होते.


आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता... 

Website- https://www.nkrathod.in

Facebook- https://www.fb.com/nkrathod.in

Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in

Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in

Telegram - https://t.me/itiupdate

आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...

YouTube- https://www.youtube.com/nkrathod

Post a Comment

0 Comments