आयटीआय पांढरकवडा येथील रोजगार भरती मेळाव्यात 165 उमेदवारांची निवड तर 74 उमेदवारांना निवड पत्र वितरण-जी. यु.राजुरकर
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) पांढरकवडा जिल्हा. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन आज दिनांक 20 जून 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घाटंजी रोड, पांढरकवडा, ता. केळापूर जि. यवतमाळ येथे करण्यात आले होते.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये
आर्म प्रायव्हेट लिमिटेड वाळुंज, छत्रपती संभाजी नगर,
स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड, अमरावती
अन्नपूर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर,
मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ,
सिएट एज्युसाईज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे,
पीआयजीओ व्हेईकल्स, बारामती पुणे
रोजगार मेळाव्याचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गजानन राजूरकर तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ हे होते. उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री सुहास गाडे जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती विद्या शितोळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ सहाय्यक उपआयुक्त यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आठ कंपन्याचे HR यांच्या उपस्थिती होते. यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आले.प्रास्ताविक श्री.एन.के. राठोड यांनी केले.
नामांकित कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एकूण 600 रिक्त पदांकरिता बेरोजगार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. होत्या.उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती तसेच मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री. सुहास गाडे यांनी उपस्थित उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन करून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..तसेच श्रीमती वि.सा. शितोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.श्री. जी. यु.राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ अध्यक्षिय भाषणातून उमेदवारांना संबोधित केले.सदर रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 205 उमेदवारांनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी प्राथमिक निवड एकूण 165 उमेदवारांची करण्यात आली तसेच एकूण 74 जणांना रोजगार मेळाव्याचे ठिकाणी ऑफर लेटर सुद्धा वितरित करण्यात आलेले आहेत.
या रोजगार भरती मेळावा करीता विशेष परीश्रम श्री.राहुल गुल्हाणे,श्री.सं.गं.यादव,श्री.वि.प.मनवर,श्री.प्रशांत ढेपे,श्री.योगेश काकडे, कौशल्य व उद्योजकता विभाग यवतमाळ तसेच श्री.गणेश देठे,कुंडलिक आत्राम,श्री.किरण राठोड,बबन कोवे,हेमराज जेधे, विशाल अर्गुलवार, यांनी केले.या मेळाव्याचे सुत्रसंचलन कु.कल्यांनी भोकरे यांनी केले.आणि आभार कु.मोनाली सेंगर यांनी केले.
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram-https://t.me/itiupda.
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments