यवतमाळ जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कविवर्य रामजी शेवाळकर आयटीआय वणी येथे २० जानेवारी रोजी होणार
आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थांच्या कलागुणांना वाह मिळावा त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, याकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय आयटीआय मध्ये प्रथम संस्था स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर त्यानंतर आता जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आयटीआय वणी येथे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हि स्पर्धा दिनांक २० जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ पर्यंत असुन जिल्हा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री. सुहास ओचावार, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वणी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहेत तर क्रीडा स्पर्धाचे अध्यक्षस्थानी मा.जि.यु.राजुरकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ राहणार असून प्रमुख उपस्थिती मा.श्री. जयंत एकरे मा.श्री. रवि माकडे मा. श्री. विवेक बन्सोडउपविभागीय अभियंता MSEDCL वणी उपविभागीय अभियंता BSNL वणी आगार प्रमुख MSRTC वणी मा.श्री.व्ही.जे. नागोरे मा.श्री.आर.व्ही. पळवेकर मा. श्रीमती यु.आर.त्रिपाठी मा.श्री. संजय दामले सदस्य जिल्हा क्रिडा समन्वय समिती यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या ठिकाणी कबड्डी, खो-खो ,क्रिकेट ,बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, आणि रनिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तर समारोप व बक्षिस वितरण दिनांक २१/०१/२०२५ दुपारी ४.०० वाजता होणार आहेत.
आयोजक :- श्री. संजय रा. तेलतुमडे, प्राचार्य व सर्व कर्मचारी वृंद औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी जि. यवतमाळ
आयटीआय संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला इतर सोशल मीडियावर फॉलो करू शकता...
Website- https://www.nkrathod.in
Facebook- https://www.fb.com/nkrathod.in
Twitter- https://www.twitter.com/nkrathod_in
Instagram- https://www.instagram.com/nkrathod.in
Telegram - https://t.me/itiupdate
आयटीआय बद्दल सर्व काही फ्क्त एक क्लिक दूर...प्रवेशा बद्दल महिती, परीक्षा बाबत माहिती, NCVT प्रमाणपत्र बाबत माहिती,रोजगार बाबत माहिती एकाच जागेवर...
YouTube- https://www.youtube.com/nkrathod
0 Comments